मुंबईः राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. आज सकाळी ईडीने नवाब मलिक यांच्या घरी छापा टाकला आणि नंतर ईडी कार्यालयात मलिक यांना चौकशी साठी नेण्यात आले. मागील काही दिवसांपूर्वी मलिक यांनी सरकारी पाहुने येणार असल्याचे सांगितले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँण्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांची चौकशी केली जात असल्याची माहिती मिळत आहे. याबाबद आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कुठले तरी प्रकरण काढून मलिकांना अडकवले जाण्याचा प्रयत्न होईल, याची आम्हाला खात्री होती, की आज ना उद्या हे घडेल, काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल याची कल्पना होतीत. असे शरद पावार यांनी प्रतिक्रिया देतांना म्हणाले.
पत्रकारांशी बोलतांना शरद पवार म्हणाले की, सद्या यंत्रणांचा गैरवापर केला जातो त्याचं हे उदाहरण आहे. नवाब मलिक जाहीरपणे बोलातात त्यांना असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे अधिक भाष्य करायची गरज नसल्याचे पवार यांनी सांगितले. पुरावे कशाचे? कसली केस काढली त्यांनी? एक साधी गोष्ट आहे, काही झालं आणि विशेषत: मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊदचा माणूस असे म्हटले जाते. कोण काय, कुठे काय माहिती नाही. देशात हे सुरु आहे. हे काही नवीन नाही. मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळी माझ्यावरही असाच आरोप होता. त्यावेळीही असे वातावरण तयार केले होते. २५ वर्ष झाली. केंद्र सरकार किंवा एजन्सीबद्दल जे बोलतात त्यांना यंत्रणांचा गैरवापर करुन त्रास दिला जातोय, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.
काय आहे प्रकरण?
मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीन काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.