‘जाणीवपूर्वक मलिकांवर राग काढण्याचा प्रयत्न’; जयंत पाटील

मुंबईः  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. पहाटे पाच वाजताच ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घऱी पोहोचले होते. यानंतर त्यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले असून चौकशी सुरु आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँण्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांची चौकशी केली जात असल्याची माहिती मिळत आहे. यावर विविध रजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. दरम्यान याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाणीवपूर्वक नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचे काम सुरू झाले असल्याचे माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले.

जाणीवपूर्वक नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचे काम सुरू झाले असल्याचे जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले  की, “हा आणखी एका सत्तेच्या दुरुपयोगाचा प्रकार आहे. कोणतीही नोटीस न देता राज्यातील एका मंत्र्यांना घेऊन जाणे ही सर्वच गोष्टींची पायमल्ली आहे. हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधातील आहे”, अशा शब्दात जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

अलीकडच्या काळात नवाब मलिक यांनी अनेक प्रकरणे बाहेर काढली होती, त्याची प्रतिक्रिया म्हणून कदाचित जाणीवपूर्वक अडचणीत त्यांना आणण्याचे काम केले जात आहे. वेळोवेळी आवाज उठवला म्हणून कदाचित नवाब मलिक यांना अडचणीत आणण्याचे काम होत असेल, असेही जयंत पाटील म्हणाले.

Share