नाशिक : शिक्षणाचा विस्तार सर्वत्र होऊन सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यात उपकेंद्रांची निर्मिती करण्यात येत आहे. यानुसार नाशिक येथील उपकेंद्राचे काम करण्यासाठी त्वरित निविदा प्रक्रिया पूर्ण करुन पुढील नियोजित कामास गती देण्यात यावी. तसेच यथवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे. असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.
नाशिक येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र, पॉलिटेक्निक नाशिक आणि मराठी भवन उभारणी संदर्भात आढावा घेतला… pic.twitter.com/fKLo9vla8s
— Uday Samant (@samant_uday) February 28, 2022
निधी उपलब्ध करुन देणार
विद्यापीठांतर्गत असणारे महाविद्यालये व शासकीय तंत्रनिकेतन मध्ये माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास महिला बचत गट, महिला मंडळ व स्वयंरोजगार संस्था यांना प्राधन्य देण्यात यावे. शासकीय तंत्रनिकेतनचा विकास करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचे प्रस्ताव सादर करावे. जिल्ह्याला क्रिडा संस्कृतीचा वारसा असल्याने शासकीय तंत्रनिकेतनच्या आवारात क्रिकेट, फुटबॉल खेळांच्या सरावासाठी मैदानाची तरतूद करून तसा प्रस्ताव सादर केल्यास शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.