रुद्राक्षापासून साकारली भव्य भगवान शिवाची मूर्ती

ओडिशा :  महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी २३ हजाराहून अधिक रुद्राक्षाचा वापर करून ओडिशाच्या पुरीतटावर भव्य भगवान शिवाची मूर्ती तयार केली आहे. सुदर्शन पटनायक हे पुरी, ओडिशा येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वाळू शिल्पकार आहेत.

महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. काश्मीरमध्ये महाशिवरात्री दरम्यान होणारी बर्फवृष्टी ही पवित्र मानली जाते. शंकराचार्य टेकडी येथील मंदिरात भक्त दिवसभर दर्शनासाठी जातात.  विशेष यात्रेचे आयोजन केले जाते. पूजेचे पदार्थ, अक्रोड, कमळाची फुले यांची विक्री करणारी दुकाने मंदिर परिसरात थाटली जातात.

Share