मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची  प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास जाणवत असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ईडीनं बुधवारी ८ तासांच्या चौकशीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली होती. अंडरवर्ल्डशी संबंध, मनी लॉंड्रिग प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर ईडीनं कारवाई केली आहे. नवाब मलिक यांना ३  मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

नेमकं प्रकरण काय आहे?

मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडावर डाॅन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. बुधवारी मनी लॉंड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.

Share