MLC Election : राष्ट्रवादीकडून खडसे,निंबाळकरांना संधी

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत रामराजे निंबाळकर यांना सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे

राज्यात येत्या २०जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. याकरिता आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने उमेदवारांची यादी जाहीर केली असून, एकनाथ खडसे आणि राम राजे निंबाळकर यांना संधी मिळाली आहे. आज एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीकडून अर्ज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

 

दरम्यान विधानपरिषदेचा १० जागांसाठी येत्या २० जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर राज्यातील राजकीय घडमोडींना अधिक वेग घेताना दिसत आहेत. शिवसेना, भाजप, काॅंग्रेस नंतर आता राष्ट्रवादी काॅँग्रेसने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या खडसेंचा राजकीय वनवास संपला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसेंचं पूनर्वसन करण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरु होता. त्यासाठी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत खडसेचं नाव पाठवण्यात आलं होतं. पण राज्यपालांनी दोन-अडीच वर्षानंतरही आमदारांची निवड केली नाही. अखेर एकनाथ खडसेंचा राजकीय वनवास थांबवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे

Share