नवी दिल्लीः कोरोना आणि ओमाक्रॉनचा देशात मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरत आहे. . देशात गेल्या २४ तासात ३ लाख १७ हजार ५३२ नवीन कोरोना रूग्ण आढळून आले असून, ओमायक्राॅन व्हेरियंटचे ९२८७ काल रूग्ण आढळून आले आहेत.
देशात काल कोरोनाचे ४९१ मृत्यू झाले आहे. देशातील दैनिक सकारात्मकता दर आता १६.१४% आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या १९ लाख २४ हजार ५१ झाली आहे. त्याचबरोबर या कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ४ लाख ८७ हजार ६९३ झाली आहे. आकडेवारीनुसार, बुधवारी दिवसभरात दोन लाख २३ हजार ९९० रुग्ण बरे झाले, तर आतापर्यंत ३कोटी ५८ लाख ७ हजार २९ लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
महाराष्ट्रात ४३ हजार नवे रुग्ण
महाराष्ट्रात बुधवारपर्यंत ४३ हजार ६९७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर कर्नाटकात ४० हजार ४९९आणि केरळमध्ये ३४ हजार १९९ रुग्ण मिळाले आहेत. भारतात या आठवड्यात ३५० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.