भारतीय तपास यंत्रणेला खूप मोठं यश प्राप्त झालं आहे.भारतीय तपास यंत्रणांना १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सहभागी असलेल्या भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एकाला पकडण्यात यश आले आहे. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी १२ बॉम्बस्फोट झाले होते, ज्यात २५७ लोक ठार आणि ७१३ जण जखमी झाले होते.
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव अबू बकर असे असून तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचे प्रशिक्षण, मालिका बॉम्बस्फोटात वापरलेले आरडीएक्स लँडिंग आणि दाऊद इब्राहिमच्या दुबईतील निवासस्थानी कट रचण्यात सहभागी होता . १९९३ च्या बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार म्हणून ओळखला जाणारा अबू बकर हा यूएई आणि पाकिस्तानमध्ये राहत होता. यूएईमधील भारतीय तपास यंत्रणांच्या माहितीवरून त्याला नुकतेच पकडण्यात आले.