“देवी सरस्वती सर्वांना…”,हिजाब प्रकरणी राहूल यांचं ट्विट

उत्तरप्रदेश- कर्नाटकातील कुंडापूर येथील शासकीय पदवीपूर्व महाविद्यालयात मुस्लीम मुलींना हिजाब घालून येण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे आता जातीय राजकारण तापतांना दिसत आहे.  हा प्रकार म्हणजे मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे . अशी टीका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी केली आहे. तर, महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील या घटनेवरून काल तीव्र शब्दात टीका केली होती. आता काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“विद्यार्थ्यीनींचे हिजाब त्यांच्या शिक्षणाच्या आड आणून आपण भारतातील मुलींचे भविष्य लुटत आहोत. देवी सरस्वती सर्वांना ज्ञान देते. ती भेद करत नाही.” असं राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आता या प्रकरणी कर्नाटक सरकार काय निर्णय घेईल हे पाहण महत्वाचं ठरेल.

Share