खासदार ओवेसी यांनी ‘झेड प्लस’ सुरक्षा नाकारली

दिल्ली : एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर गोळीबार करत हल्ला करण्यात आला. उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तींनी ओवेसींवर हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात जीवीत हाणी झाली नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दिलेली झेड दर्जाची सुरक्षा ओवेसी यांनी नाकारली आहे.

ओवेसी लोकसभेत बोलताना म्हणाले की, ‘माझ्या वाहनावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी. बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार हल्लेखोरांवर कारवाई करण्यात यावी आणि या देशातील कट्टरतावादाचा अंत करावा. मला झेड दर्जाच्या सुरक्षेची गरज नाही. मला ए दर्जाचे नागरिक होण्याची इच्छा आहे. मला जगायचे आहे, बोलायचे आहे. जेव्हा या देशातील गरीब सुरक्षित असतील, त्यावेळीच मी सुरक्षित असेल. माझ्या कारवर हल्ला करणाऱ्यांना घाबरायची मला गरज नाही. सरकार या हल्लेखोरावर ‘यूएपीए’ नुसार का कारवाई करत नाहीत, असे ओवेसी यांनी सांगितले

 

 

Share