मुंबई- भारताचा माजी कर्णधार ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीनं याआधीच आयपीएल वगळता इतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या धक्क्यातून त्याचे चाहते सावरतात न सावरतात, तोच महेंद्रसिंह धोनीनं त्याच्या चाहत्यांना अजून एक मोठा धक्का दिला आहे. आयपीएलचा यंदाचा हंगाम अगदी तोंडावर आलेला असताना महेंद्रसिंह धोनीनं CSK अर्थात चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदावरून पायउतार होत असल्याचं जाहीर केलं आहे. धोनीनं चेन्नईचं कर्णधारपद भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाकडे सोपवलं आहे. त्यामुळे आता यंदाच्या आयपीएलमध्ये रवींद्र जाडेजा चेन्नईच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे.
We use the expression "end of an era" very loosely sometimes. But Dhoni giving up the captaincy of @ChennaiIPL is truly the end of an era for all those loyal fans with whom he forged a relationship of the kind very few have.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) March 24, 2022
कर्णधार म्हणून माहीनं आत्तापर्यंत आयपीएलमध्ये इतर कोणत्याही कर्णधारापेक्षा जास्त सामने खेळले आहेत आणि जिंकून देखील दिले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि रायजिंग पुणे जायंट्स या दोन्ही संघांसाठी मिळून धोनीने कर्णधार म्हणून आत्तापर्यंत २०४ सामने खेळले आहेत. त्यातल्या १२१ सामन्यांमध्ये विजय तर ८२ सामन्यांमध्ये पराभवर स्वीकारला आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. धोनाने भारतीय संघाचा कर्णधार असताना देखील चांगल्या पध्दतीने सांभाळली आहे.