जुनी पेन्शन लागू करण्यासाठी पटोलेंच मुख्यमंत्र्याना पत्र

मुंबई : राजस्थान, छत्तीसगड या काॅंग्रेसशासित राज्याच्या प्रमाणेच महाराष्ट्रातही निवृत्त राज्य सरकारी कर्मचऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

नाना पटोले यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की, राज्य सरकारी कर्मचारी हा प्रशासकीय व्यवस्थेचा कणा आहे. त्यांच्या कार्यकाळातील सेवेची दखल घेत आणि उतारवयातील त्यांच्या निर्वाहाटी तरतूद म्हणून या कर्मचाऱ्यांनी निवृत्तीवेतन दिले जाते. राज्य सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी संखाय सुमारे साडेसह लाख आहे. राज्य सरकारने १ नोव्हेंबर २००५ पासून ही पेन्शन योजना बंद करुन अंशदानावर आधारित डीसीपीएस- एनपीएस योजना लागू केली आहे.

 

दरम्यान गेल्या काही वर्षातील कर्मचाऱ्यांचा अनूभव लक्षात घेता ही योजना फसवी असल्याच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी असून त्या रास्त आहेत. जुनी पेन्शन योजना लागू केल्यास या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आयुष्य जगता येईल. या विषयात आपण लक्ष घालून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

Share