मुंबई- राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वी ईडीने चौकशी करत अटक केली होती. ईडीने केलेल्या कारवाई विरोधात मलिकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेसंदर्भात आज न्यायालयात सुनावणी झाली असून न्यायालयाने मलिकांची याचिका फेटाळून लावली आहे. ईडीने आपल्यावर केलेली कारवाई बेकायदेशीर आणि चुकीची असून आपल्याविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी मलिकांनी केली होती.
Breaking | Nawab Malik Arrest: Bombay High Court Denies Interim Relief, Judicial Custody To Continue @nawabmalikncp,@CourtUnquote https://t.co/cehHhfcqPX
— Live Law (@LiveLawIndia) March 15, 2022
नवाब मलिक यांची याचिका फेटाळताना मुंबई उच्च न्यायालयाने याचिकेवर तपशीलवार सुनावणी आवश्यक असल्याचं नमूद केलं आहे. याचिका तपशीलवार ऐकायची असल्याने, तसेच याचिकेतील काही मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा आवश्यक असल्याने सुटकेचे अंतरिम आदेश काढता येणार नाहीत, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. मलिकांवरील आरोप हे गंभीर स्वरुपाचे असून त्यांचा संबंध अंडरवर्ल्डशी आहे. तसेच त्यांनी 1993 साली झालेल्या बाँम्ब हल्यातील आरोपींसोबत व्यवहार केल्याचा आरोप देखील मलिकांवर आहे.