मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टिका केली आहे. आज काॅंग्रेसच्या नेत्यांनी फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलन करणार होते. पंरतू मुंबईकरांची अधिक गैरसोय होऊ नये म्हणून काँग्रेसने भाजपविरोधात पुकारलेलं आजचं आंदोलन थांबवत असल्याचं पटोले यांनी सांगितलं.
हम से जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा !
देवेंद्र फडणवीस जी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है।
भाजपा मुंबईच्या सर्व पदाधिकारी,कार्यकर्त्यांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार!देशाची माफी तर @INCIndia ने मागायला हवी…!
– विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis pic.twitter.com/dWvW5kamlm— BJP Mumbai (@BJP4Mumbai) February 14, 2022
यावर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. तुम्ही सर्व इथे उत्सफूर्तपणे आलात. त्याबद्दल तुमचं स्वागत. तुम्ही असताना कुणाची हिंमत नाही या ठिकाणी येऊन निदर्शने करतील. पंतप्रधान मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. उलट काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे. काँग्रेसने या देशाचा बट्ट्याबोळ केला आहे. नाना पटोले वगैरे हे नौटंकीबाज लोकं आहेत. त्यांनी कितीही नौटंकी करू द्या. त्याचा काही परिणाम होणार नाही, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी पटोलेंवर केला. तसेच यावेळी त्यांनी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे हात जोडून आभारही मानले.