‘जरुरत पडी तो काटुंगा भी’, रावत यांचा शाहांवर पलटवार

उत्तराखंडः   पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या सुरू आहे. यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज  उत्तराखंड, गोवा मतदान प्रक्रिया सुरू आहे. मतदान प्रक्रिया सुरू होण्या आधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. अमित शाह यांनी ना घर का ना घाट का अशा शब्दात रावत यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर आता रावत यांनी पलटवार केला आहे.

माजी मुख्यमंत्री हरीश रावत अमित शाहा यांना प्रतिउत्तर देताणा म्हणाले की,अमित शाह, नरेंद्र मोदी, योगी आणि त्यांच्या तमाम मंत्रिमंडळाचा मी आभारी आहे. सर्वजण दोन-दोन, चार-चार काठ्या माझ्यावर चालवत आहेत. अमित शाह यांनी तर खूप मोठी गोष्ट केलीय. धन्य आहेत ते आणि भाजपची संस्कृती. अमित शाह यांनी ना घर का ना घाट का अशा शब्दात रावत यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर बोलताना जर ते आपल्या राजकीय विरोधकांना कुत्रा समजतात तर ती त्यांची समज आहे, असे रावत म्हणाले.

रावत पुढे म्ह णाले की, जेवढी माझी समज आहे आमच्याकडे कुत्र्याला भैरोचा अंश मानतात, तो चौकीदार आहे. भैरों देवतांचे चौकीदार आहेत, तर कुत्रा घराचा. जर मी कुत्रा असेल तर मी उत्तराखंडचा चौकीदार आहे. जर उत्तराखंडसाठी भुंकावे लागले तर मी भुंकेन, बोलावे लागले तर बोलेन आणि एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवावी की, जर चावा घ्यावा लागला तर तोही मी घेईन’, अशा शब्दात रावत यांनी शाहांना प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपने केलेल्या सर्व आश्वासनांवर उत्तराखंडीयत हावी होती. त्यामुळेच पंतप्रधान मोदींना एवढी वर्षे ज्या टोपीची आठवणही आली नाही. त्यांना ती टोपी उत्तराखंडमध्ये जाऊन घालावी लागली. उत्तराखंडमध्ये जनता विरुद्ध भाजप असे मतदान होत आहे. अशी टीका रावत यांनी केलीय.

 

Share