कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

कर्जतः महाराष्ट्रातील १०६ नगरपंचायंतीच्या निवडणुकीची दोन टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याने ओबीसींच्या जागांशिवाय निवडणूक घेण्याचे ठरवले होते. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने ओबीसी राजकीय आरक्षणासाठी राखीव ठेवलेल्या जागांसाठी खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेण्याचे आदेश दिले. राज्यातील नगर पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे.  अहमदनगर जिल्हातील कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादीने आपला झेंडा रोवला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने एकहाती सत्ता काबिज केली आहे. राष्ट्रवादीच्या १७ जागांन पैकी १२ जागा जिंकल्या आहेत.

कर्जत नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी २२ डिसेंबरला १३ जागांवर मतदान झाले .तर उर्वरीत ४ जागांसाठी काल मतदान झाले, एकूण ८०.२१ टक्के मतदान झाले होते. आज सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीलाच कर्जत नगरपंचायतीचा निकाल लागला आहे. १७ पैकी राष्ट्रवादीने १२ जागा जिंकल्या आहेत.  तर ३ जागा ह्या काँग्रेसने जिंकल्या आहेत. तर २ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदेया दोन नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.

कर्जत नगरपंचायतीवर भाजपची सत्ता येईल, असा विश्वास माजी मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी शिंदे यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे. दबाव, दडपशाही, पैशाचा उतमात आणि सत्तेची मस्ती यापूर्वी कर्जदारांनी पाहिली नव्हती, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. राज्यात बहुतांशी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा – अहमदनगर
नगरपंचायत – कर्जत
निकाल-
भाजप-२
राष्ट्रवादी- १२
काँग्रेस- ३

Share