सपाला मोठा धक्का ! मुलायम सिंह यांच्या सुनेचा भाजपात प्रवेश

उत्तरप्रदेश- उत्तप्रदेशात पक्ष बदलाचे वारे वाहत आहेत. त्यातच भाजपच्या काही मंत्र्यांनी आणि आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी देत सपामध्ये प्रवेश केला. तर काही सपा नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. आता सपाला मात्र मोठा धक्का बसला आहे. सपाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांच्या सुन अर्पणा यादव यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

हरियाणाचे भाजपा प्रभारी अरुण यादव यांनी मंगळवारी रात्री ट्विट करत सांगितलं की, “मुलायम सिंग यादव यांचा लहान मुलगा प्रतिक याची पत्नी अपर्णा यादव उद्या भाजपात प्रवेश करणार आहे. योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता पक्षप्रवेश होईल अस त्यांनी म्हंटल होत.

 

त्यानूसार आज सकाळी १० वाजता उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या आणि प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंग यांच्या उपस्थितीत अपर्णा यादव यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे यादव कुटुंबातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

 

 

 

Share