नवाब मलिकांच्या कारागृहातील ‘या’ मागण्या मान्य

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री यांना मनी लाँड्रींग प्रकरणी ईडीने चौकशी करत अटक केली होती. त्यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ईडीच्या विशेष न्यायालयाने मलिकांच्या कोठडीत ४ एप्रिल पर्यंत वाढ केली आहे. मात्र नवाब मलिकांना पाठीचा त्रास होत असल्यामुळे बेड, खुर्ची आणि चटई वापरण्यास मुभा देण्यात आली आहे.

मनी लाँड्रींग प्रकरणाच्या आरोपाखाली नवाब मलिकांना २३ फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती. त्यांना कोर्टात हजर केले असता आधी ३ मार्चपर्यत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या सुनावणीत पुन्हा कोठडीत वाढ झाली होती आणि २१ मार्चपर्यत कोठडी देण्यात आली होती. काल कोठडी संपत आल्यामुळे पुन्हा एकदा मलिकांच्या कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र, नवाब मलिक यांना  पाठीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना खुर्ची, खाट आणि गादी द्यावी अशी विनंती करण्यात आली होती. याबाबतचा अहवाल कोर्टात सादर करण्यात आला आहे.  कोर्टाने मलिक यांची मागणी केली असून  कारागृहात मलिक यांना बेड, खुर्ची आणि चटई वापरण्यास मुभा देण्यात आली आहे. तसंच घरचे जेवण देण्याची मागणी केली असून वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो अहवाल पाहिल्यानंतर मंजुरी दिली जाईल.

दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मलिक यांचे खाते इतर मंत्र्यांकडे सोपवण्याची तयारी केली आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना फोन करून चर्चा केली आहे. शरद पवार यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. यावेळी नवाब मलिक यांच्या मंत्रालयातील खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर मंत्र्यांकडे वर्ग करण्यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

Share