काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेत राष्ट्रवादी सहभागी होणार

मुंबई : काॅँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काल महाराष्ट्रात पोहोचली आहे. या यात्रेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. १० नोव्हेंबर २०२२ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील सहभागी होणारं आहेत. तर राजेश टोपे आणि राजेंद्र शिंगणे भारत जोडो यात्रा बुलढाणा येथे आल्यानंतर आपला सहभाग नोंदवणार आहे. आमदार रोहित पवार देखील हिंगोली येथ राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होणार आहे.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा काल महाराष्ट्रात पोहोचली आहे. २ महिन्यांपूर्वी कन्याकुमारी येथून सुरू झालेला हा प्रवास कर्नाटकातून तेलंगणा आणि आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे. सोमवारी रात्री नांदेडमध्ये भारत जोडो यात्रेने प्रवेश केला. हजारो मशाली घेऊन राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते तेलंगणातून नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाले.

 

या पाच जिल्ह्यातून जाणार भारत जोडो यात्रा
राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून १४ दिवस ही यात्रा तब्बल ३८४ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. अकोला जिल्ह्यातील यात्रा मार्गांवर राहुल गांधी कारने प्रवास करणार आहेत. काँग्रेसच्या या यात्रेत अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्याच दिसून येतं आहे.

Share