मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेतून घरात आणि जनतेच्या मनात पोहोचलेले आहेत. तर आता त्यांनी नथूराम गोडसे यांनी भूमीका सकारली आहे. ‘मैंने गांधी को क्यों मारा’ या चित्रपटाच्या माध्यमातून नथूराम गोडसे यांची सकारलेल्या भूमिकेवर संमिश्र प्रतिक्रिया दिसत आहेत. यावर अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट द्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अमोल कोल्हे यांची फेसबुक पोस्ट काय?
२०१७ साली केलेला “Why I killed Gandhi” हा सिनेमा Limelight या ओटीटी
प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असं समजलं आणि अनेकांनी विचारलं डाॅक्टर तुम्ही नथुराम गोडसे या भूमिकेत? उत्तरादाखल मला कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवलं- “हा महाराष्ट्र कीर्तनानं पूर्णपणे घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही!” या वाक्यातील नकारात्मक सूर बाजूला ठेवला तर मला या वाक्यात एक सकारात्मक गोष्ट जाणवते ती म्हणजे “Reel लाईफ” आणि “Real लाईफ” यातील फरक स्पष्ट करणारी सीमारेषा अधोरेखित करणं.
कलाकार म्हणून भूमिका साकारत असताना काही भूमिका आव्हानात्मक असतातच आणि त्यांच्या विचारधारेशी सुद्धा आपण सहमत असतो आणि त्या साकारताना समाधानही मिळतं परंतु काही अशा भूमिका अचानक समोर येतात ज्या विचारधारेशी आपण सहमत नसतो पण कलाकार म्हणून त्या आव्हानात्मक असतात. अशीच ही भूमिका नथुराम गोडसे. मी व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही तरी समोर आलेल्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आणि व्यक्ती म्हणून विचारस्वातंत्र्याचा!
याच मनमोकळेपणाने आपण या कलाकृतीकडे पहावं ही अपेक्षा!
२०१७ मध्ये "why I kill Gandhi" या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती, तेव्हा मी राजकारणात नव्हतो.
~ खा.अमोल कोल्हेखासदार साहेब, नथुरामने १९४८ मध्ये गांधीजींची हत्या केली, २०१८ मध्ये नाही.
तुम्ही राजकारणात येण्या अगोदरही नथुराम देशद्रोही होता; आणि नंतरही..!!— Khajim Deshmukh (@DeshmuKT1) January 20, 2022
एकीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांनी अमोल कोल्हे यांच्या भूमिकेकडे एक कलाकार म्हणून पाहा असं म्हटलंय. तर कोल्हे यांनी केलेल्या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहीजणांनी राजकीय नेता आणि कलाकार या दोन वेगळ्या बाजू आहेत असं म्हटलं आहे. तर कोल्हे हे आता केवळ कलाकार नाहीत. ते देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे एक सदस्य आहेत. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या हत्येचं जर उदात्तीकरण होत असेल तर गांधी हत्या योग्य होती असंच लोक समजतील, असंही मत काहींनी व्यक्त केली आहे.
I can see Jitendra Avhad protesting against Amol kolhe by stopping his vehicle and raising slogans.
"गांधी हम शरमींदा है आपका कातील जिंदा है"
That's what they did with @SharadPonkshe ji and Vinay Aapte ji https://t.co/BysWulCbXe— खडकवासल्याचा कोलंबस🇮🇳 (@aapalacolumbus) January 21, 2022
शंभूराजांची भूमिका साकार करुन प्रसिद्ध झालात आणि खासदार सुद्धा …
समर्थन केल्याची लाज वाटते आता #Dr.Amol_kolhe— Kunal_04 (@kunalsg_04) January 20, 2022