पाकिस्तान: लाहौरमध्ये अनारकली बाजारात भीषण स्फोट

लाहौर- पाकिस्तानच्या लाहौरमधील अनारकली बाजार येथे आज भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात तीन जण ठार झाले असून २० जण जखमी झाले आहेत. या स्फोटात टाइम डिव्हाईसचा वापर करण्यात आला असल्याच म्हटलं जात आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला ते ठिकाण भारतीय वस्तूंच्या विक्रीसाठी ओळखले जाते, असे पोलिसांनी सांगितले आहे.

 

लाहौर पोलिसांचे प्रवक्ते राणा आरिफ यांनी स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. या स्फोटामुळे जवळपासच्या दुकानांच्या आणि इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत, असे वृत्त डॉन वृत्तपत्राने दिले आहे. तर, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वस्तूंची विक्री होणाऱ्या पान मंडईजवळ हा स्फोट झाला आहे.

 

Share