मुंबई : देशातील पाचही राज्यातील निवडणुकांचे निकाल हाती लागल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. आजपासून डिझेल आणि पेट्रोलचे दरात प्रतिलिटर ८० पैशांनी वाढ करण्यात आली आहे. याच मुद्यावरुन आता राष्ट्रवादी काॅंग्रेसन केंद्र सरकार जोरदार टिका केली आहे.
आजपासून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचे नवीन दर लागू झाले आहेत. त्यानुसार एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तब्बल ५० रूपयांची वाढ झाली असून मुंबईत एक घरगुती एलपीजी सिलिंडर आता ९५० रूपयांना मिळणार आहे. तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्येसुद्धा ८० पैशांची वाढ झाली आहे. आधीच कोरोना महामारीनंतर आर्थिक ओढाताण सहन करणाऱ्या जनतेला ‘महागाईचा बुस्टर डोस’ केंद्राकडून दिला जात आहे. उदरनिर्वाहाची कसरत करताना लोकांच्या अक्षरश: नाकी नऊ येत आहेत. त्यात ही दरवाढ म्हणजे दुष्काळात तेरावा महिनाच ठरणार आहे. अशी टिका राष्ट्रवादी काॅंंग्रसेकडून करण्यात आली आहे.
पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा
आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMS च्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP ९२२३११२२२२ आणि एचपीसीएल ग्राहक यांना ९२२२२०११२२ संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. सकाळी ६ वाजल्यापासून नवी दर लागू केले जातात.