सुरक्षेच्या मुद्यावरुन पडळकरांचे राऊतांना थेट आव्हान

मुंबई : भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी शिवसेना खा. संजय राऊत यांना थेट आव्हान दिले आहे. शिवसेनेनं वाय दर्जाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन सामना मधुन केंद्र सराकारवर जोरदार निशाणा साधल्यानंतर पडळकर यांनी शिवसेनेला उत्तर दिलं आहे.

संजय राऊत राऊत तुम्ही वाय सुरक्षेबाबत लेख लिहता पण माझे तुम्हाला खुले आव्हान आहे. माझ्यासारखं महाराष्ट्रामध्ये सुरक्षेच्याविना फिरा म्हणजे शेतकऱ्यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे, याची तुम्हाला खरी प्रचिती येईल, असा टोला पडळकर यांनी लगावला आहे. तसेच,राऊत अजूनही उर्जामंत्र्यांच्या आश्वासनानंतर सुद्धा शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त तुम्ही करताय. यावर कधीतरी एखादा लेख लिहावा असं तुम्हाला वाटलं नाही,” असंही पडळकर म्हणाले आहेत.

पुढे बोलताना पडळकर म्हणाले की, संजय राऊत उत्तरप्रेदश व गोवा निवडणुकीत तुमच्या पक्षाला नोटा पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. आदित्य ठाकरे यांना देशपातळीवर लाँच करून त्यांचा पुरता फज्जा उडवण्यामध्ये तुम्ही यशस्वी झाला आहात. कदाचित ज्यापद्धतीने काकांनी राहुल गांधींना एक टोपणनाव मिळवून दिले. तशीच तुमची काही सुप्त इच्छा आदित्य ठाकरे यांच्याबाबतीमध्ये दिसतेय, असा टोला पडळकर यांनी लगावला आहे.

Share