नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी नंबर एकचा पक्ष

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायतीच्या  नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या नंबरचा पक्ष ठरला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे. दरम्यान, या निवडणुकीत राज्यात एक नंबरचा पक्ष ठरलो अशा बाता मारणाऱ्या भाजपला दुसरा नंबरही गाठता आलेला नाही  तर भाजपला दुसरा क्रमांकही गाठता आला नाही असं म्हणत त्यांनी भाजपला चिमटे काढले आहे.

यावेळी ते म्हणाले, नगरपंचायत निवडणूकीत विरोधकांनी राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी अनेक षडयंत्र रचलीत. तरीही महाराष्ट्रातील जनतेने नगरपंचायतीत राष्ट्रवादीला कौल दिला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष – ३०, उपनगराध्यक्ष – ३०, शिवसेना नगराध्यक्ष – २७ उपनगराध्यक्ष – १६, कॉंग्रेस नगराध्यक्ष – २० उपनगराध्यक्ष – २१, भाजप नगराध्यक्ष – २०, उपनगराध्यक्ष – २१ याचा अर्थ एक नंबरचा पक्ष दुसर्‍या नंबर गाठू शकला नाही असेही महेश तपासे म्हणाले आहेत.
Share