शेकपचे ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील यांच निधन

कोल्हापूर-  शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यपक एन.डी. पाटील यांचं निधन झालं आहे. कोल्हापुरात उपचारादरम्यान वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी अस्वस्थता वाटत होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं . कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाचा संसर्ग देखील झाला होता. परंतु या वयात देखील त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांच्या अनेक प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले.

भूषविलेली पदे-

 • रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य
 • समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष
 • अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष
 • डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष
 • जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक
 • म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष
 • दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष
 • महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य

मिळालेले सन्मान-

 • भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४
 • स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९
 • राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००
 • डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००
 • विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१
 • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी
 • शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार

 

Share