देशासाठी काय पण,पंतप्रधानांनी रद्द केला विवाह सोहळा

आतंरराष्ट्रीय– जगभरात ओमिक्राॅनचा आणि कोरोनाचा संसर्गाने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यातच  न्यूझीलंडमध्येही वाढत्या ओमिक्राॅनचा प्रादुर्भावामुळे अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  या निर्बंधांमुळे तिथल्या पंतप्रधानांनी चक्क स्वतःचं लग्नच रद्द केलं आहे.

न्यूझीलंडमध्ये कोरोना पार्श्वभूमीवर नव्या निर्बंधांची घोषणा करतानाच न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी आपण आपलं लग्न रद्द करत असल्याचीही घोषणा केली. नव्या निर्बंधांनुसार कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला  संपूर्ण लसीकरण झालेल्या १०० नागरिकांनाच उपस्थित राहता येणार आहे. आपलं लग्न रद्द करण्याच्या निर्णयानंतर जेसिंडा म्हणाल्या, देशातले अनेक नागरिक असे आहेत ज्यांना नव्या निर्बंधांमुळे, महामारीमुळे असे निर्णय घ्यावे लागले आहेत. मी त्याबद्दल त्यांची माफी मागते.

जेसिंडा आणि त्यांचे जोडीदार क्लार्क गेफॉर्ड यांनी आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली नव्हती. मात्र हे लग्न पुढच्या काही आठवड्यांमध्ये होणार असल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले होते.

Share