निलेश राणे यांना पोलिस कोठडी

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. कणकवली दिवाणी न्यायालायने हा निर्णय दिला आहे.

आज नितेश राणे यांनी  न्यायालयासमोर आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आत्मसमर्पण केल्यानंतर नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, सरकारी वकील प्रदीप घरत यांनी नितेश राणे यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. पोलिसांना या प्रकरणाच्या तपासासाठी नितेश राणे यांची पोलीस कोठडी गरजेची आहे का, असा सवाल न्यायालयाने पोलिसांना विचारला. त्यानंतर पोलिसांचा अहवाल आल्यानंतर न्यायालयाने नितेश राणे यांच्या पोलीस कोठडी ठोठावली.

नेमक प्रकरण काय?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीदरम्यान शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबरला जीवघेणा हल्ला झाला होता. इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी आपल्यावर शस्त्राने हल्ला केल्याचा दावा संतोष परब यांनी केला आहे. या हल्लामागे भाजप आमदार नितेश राणे असल्याचा आरोप संतोष परब यांनी केला होता. संतोष परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय आहेत.

Share