मुंबई- राज्यात नुकत्याच जाहीर झालेल्या नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणूकीच्या निकालावरुन क्रमांक एकसाठी महाविकास आघाडी आणि भाजपात चढाओढ सुरु आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दावा करत राज्यातील एकूण निकालापैकी ८० टक्के निवडून आले आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेने भाजपला नाकारले आहे असं वक्तव्य केलं होतं. याला उत्तर म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे की, राज्यात भाजपचं क्रमांक एकचा पक्ष आहे आणि राहिलचं असा विश्वास त्यांनी या माध्यमंतून व्यक्त केला आहे.
मविआ सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता-राहील.
भाजपाच्या 24 आणि सहयोगी मिळून सर्वाधिक 30 नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली.सदस्यसंख्येत सुद्धा सर्वाधिक 415 हून अधिक जागा जिंकत भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. pic.twitter.com/Sf4QcAIHNn— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 19, 2022
फडणवीस यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, महाविकास आघाडीकडून धनशक्ती , दंडशक्ती आणि सत्तेचा कितीही गैरवापर केला तरी राज्यात भाजपाच्या २४ आणि सहयोगी मिळून सर्वाधिक ३० नगरपंचायतींमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली आहे.तसेच सदस्यसंख्येत सुध्द भाजपच अव्वल आहे ४१५ हून अधिक जागा भाजपच्या पदरात पडल्या आहेत. कितीही पक्ष एकत्र आले तरी या देशातील जनता ही पंतप्रधानांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवते . हे पुन्हा एकदा जनतेने दाखवून दिले आहे. असं ट्विट करत त्यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून जनतेचे आभार मानले आहे.