सोमवारपासून शाळा सुरु होणार? शिक्षण विभागाचा प्रस्ताव

मुंबई-  कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यातील शाळा परिस्थितीनूसार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबईतील रुग्ण झपाट्याने वाढली या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रथम मुंबईतील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. या नंतर राज्यातील सर्व शाळा १५ फेब्रुवारी पर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र आता कोरोनाची परिस्थिती पाहता रूग्ण संख्येत मोठी घट होतांना दिसत आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून शाळा सुरु करण्याची मागणीचा जोर सुरु होता केली . याचीच दखल घेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे शाळा सुरु करण्याबाबत  प्रस्ताव सादर केला आहे.

वर्षा गायकवाड पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, मधील काळात शिक्षणतज्ज्ञ किंवा पालक संघटनांशी चर्चा झाली त्यावेळी आम्हाला पत्रं, निवदेनं प्राप्त झाली. शाळा सुरु झाल्या पाहिजे असं अनेकांचं म्हणणं होतं. पण मधील काळात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याने सरकारने शाळा, महाविद्यायलं सुरु करु नयेत असा निर्णय घेतला होता.

तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल तिथे स्थानिक पातळीवर निर्णयाचे अधिकार द्यावेत असा मुद्दा मांडण्यात आला. त्यानुसार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तसा प्रस्ताव सादर केला आहे. येत्या सोमवारपासून शाळा सुरु कऱण्याचा विचार करावा असं प्रस्तावात सांगण्यात आलं आहे. स्थानिक पातळीवर आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय घेतला जावा. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवली असून सकारात्मक प्रतिसाद येईल अशी अपेक्षा आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली.

 

Share