मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून भोंग्याचे राजकारण करुन सामाजिक वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न ठराविक राजकीय पक्षाकडून सुरु आहे. यावर कोणीही महाराष्ट्रात अल्टिमेटमची भाषा करु नये असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता दिला.
अजित पवार म्हणाले, राज्यातील कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. सगळ्यांना नियम सारखे आहेत. भोंग्यांसाठी अधिकृत परवानगी घ्यावी. हे आव्हान करून देखील कोणी परवानगी घेतली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच नागरिकांनी कोणत्याही भावनिक आवहनाला बळी पडू नये. कायदा हातात घेण्याचं धाडस कोणीही करू नये. न्यायालयाने सांगितलेली आवाजाची मर्यादा पाळा, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यात मागील काही दिवसांपासून भोंग्याचे राजकारण करून सामाजिक वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न ठराविक राजकीय पक्षाकडून सुरु आहे. यावर कोणीही महाराष्ट्रात अल्टिमेटमची भाषा करू नये, असा थेट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांनी दिला आहे. #Loudspeakers pic.twitter.com/WQXyX7TjI5
— NCP (@NCPspeaks) May 5, 2022
दरम्यान, जे कोणी परवानगी घेणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल असा इशाराही अजित पवार यांनी केला. इथे काही हुकुमशाही नाही, कोणाही अल्टिमेटम देऊ नये. कायद्याने सर्व काही चालते. नियम सर्वांना सारखे असले पाहिजेत असेही पावर म्हणाले. उत्तर प्रदेशमधील जहागीरपूरमध्ये दिल्ली येथील दंगलीनंतर तेथील मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांच्या आश्रमावरील भोंगा उतरवला. त्यानंतर त्यांनी भोंगे काढण्याचे आवाहन देखील केल्याचे अजित पवार म्हणाले.