मेट्रोच्या कामात राजकारण नको – अजित पवार

पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले इतकेच नाही तर पंतप्रधान मोदींनी मोबाईलद्वारे तिकीट काढत पुणे मेट्रोतून प्रवासही केला. त्यानंतर एमआयटी महाविद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यामुळे नागपूरच्या मेट्रोचे काम पूर्ण झाले. त्याचप्रमाणे इतर शहरातील मेट्रोची कामे वेगाने सुरु करण्यासाठी आपण सहकार्य करावे, असे वक्तव्य अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केले.

नागपूरच्या मेट्रोचे काम ज्या पद्धतीने वेगाने झाले, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या मेट्रोचे काम देखील वेगाने सुरु होण्यासाठी आपल्याकडून मदत मिळावी. विकासात कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता एकजूटीने काम करु असा विश्वास पंतप्रधानांना देतो असे अजित पवार यावेळी म्हणाले. पुढच्या काळात शासनाकडून खरेदी येणारी वाहने पर्यावरणपूरक असतील असे अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नाव न घेता एकप्रकारे पंतप्रधान मोदींकडे तक्रार केलीय.

अलिकडे अनेक गोष्टी घडत आहेत. सन्मानीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्ये केली जात आहेत. ही वक्तव्ये महाराष्ट्राला मान्य होणारी नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थान केले. ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाचा पाया रचला. या महामानवांच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे न्यायाचा आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही आकस नाही, हे ही नम्रपणे नमूद करतो, अशा शब्दात अजित पवार यांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार यांनी एकप्रकारे राज्यपालांची पंतप्रधान मोदींकडे तक्रार केलीय.

पवारांनी पंतप्रधानांकडे केली राज्यपालांची जाहीर तक्रार

Share