मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच आता या प्रकरणी पुढील सुनावणी ६ जानेवारीला होणार आहे. त्यामुळे तुर्तास मलिकांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.
Money laundering case | Bombay HC refuses to urgently hear the bail plea of NCP leader and Maharashtra's former minister Nawab Malik and postponed the hearing till January 6. Court has directed the ED to file a reply within 2 weeks regarding the status of Nawab Malik's health. pic.twitter.com/PNOMbfXAlT
— ANI (@ANI) December 13, 2022
काय आहे प्रकरण ?
मुंबईच्या कुर्ला येथील जमीन खरेदी विक्रीमध्ये मनी लॉन्ड्रीग आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची ३ एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे ३०० कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. ईडीचा आरोप आहे की मलिक यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला जमिनीसाठी पैसे दिले. पारकरने ते पैसे दाऊद इब्राहिमला दिले असा दावा करत हे टेरर फंडिंग असल्याचा आरोप ईडीने केला आहे.