राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी फोन करुन ही धमकी दिल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या मुंबईतल्या घरी म्हणजे सिल्व्हर ओके येथे फोन आला होता. फोनवरून समोरील व्यक्तीने पवारांची हत्या करण्याची धमकी दिली. मुंबईत येऊन गावठी कट्ट्याने शरद पवारांना जिवे मारू, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने दिलीये. ज्या व्यक्तीने धमकी दिली, ती व्यक्ती हिंदीतून बोलत होती. धमकीचा फोन आल्यानंतर या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली. गावदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम २९४, ५०६ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस प्रकरणाच तपास करत आहेत.

Share