मुंबई : शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. मुंबई सत्र न्यायालयात संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज सुनावाणी पार पडली. यावेळी न्यायालायाने वेळे अभावी आजच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब करून पुढील आता ती १७ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता ठेवली आहे. त्यामुळे राऊतांचा मुक्काम आता १७ ऑक्टोंबरपर्यंत कोठडीतच असणार आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला. आज राऊत यांना पुन्हा एकदा PMLA न्यायालयात हजर केले होते. राऊत यांचा जामीन अर्ज आणि नियमित सुनावणी एकाचवेळी आज झाली. ईडीकडून सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेत संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर १७ ऑक्टोबरला सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे राऊत यांना जेलमध्येच मुक्कामी थांबावे लागणार आहे.
Patra Chawl land scam case | Judicial custody of Shiv Sena leader Sanjay Raut extended till 17th October pic.twitter.com/ctSgqEzC3N
— ANI (@ANI) October 10, 2022
काय आहे पत्राचाळ घोटाळा?
मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे तीन हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं, त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर २०११ , २०१२ आणि २०१३ मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले. पत्राचाळ जमीन घोटाळा हा १,०३४ कोटी रुपयांचा असल्याचा संशय ईडीला आहे.