सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वाॅरंट काढलं आहे. हे. या प्रकरणी पुढील सुनावणी ११ जुलै २०२२ रोजी होणार आहे. शिराळा न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यात वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल न्यायदंडधिकाऱ्यांनी २८ एप्रिल रोजी अजामीनपत्र वाॅरंट बजावलं होतं. याप्रकरणी ८ जूनला सुनावणी झाली असता राज ठाकरे गैरहजर राहिले. यानंतर कोर्टाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढलं आहे.
शिराळा कोर्टाने २००८ मध्ये राज ठाकरेंच्या अटकेनंतर झालेल्या आंदोलनप्रकरणी एप्रिल महिन्यात वॉरंट काढलं होतं. पण राज ठाकरेंना करोनाची लागण झाली असल्याने बुधवारी झालेल्या सुनावणीला गैरहजर राहिले. मनसेचे नेते शिरीष पारकर या सुनावणीसाठी उपस्थित होते. त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला. पण राज ठाकरे गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मनसेने २००८ साली रेल्वेमध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी यासाठी मनसेने आंदोलन करणयात आले होते. याबद्दल कल्याण न्यायलयात राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी राज ठाकरेंना अटक केली होती. त्यामुळे महाराष्ट्रभर मनसेने आंदोलन करून अनेक ठिकाणी बंद पुकारलं होता. यावेळी तालुका मनसेकडून तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून सावंत यांच्यासह दहा जणांवर गुन्हे दाखल झाले होते.
सांगली जिल्ह्यात मनसेचे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी शिराळा तालूक्यातील शेडगेवाडी जवळ आंदोलन करुन दुकानांची तोडफोड केली होती. त्यानंतर याबाबतचा गुन्हा शिराळा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, जिल्हाअध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासहित अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल आहे. या खटल्यामध्ये राज ठाकरे यापूर्वी एकदा न्यायालयात हजर देखील झाले होते. मात्र पुढील तारखांना गैरहजर राहिल्यामुळे कोर्टाने आता राज ठाकरे यांच्या विरोधात वॉरंट काढलं आहे.