मुंबई : २०२२ मध्ये होणाऱ्या आय़पीएल आयोजनात मोठे बदल होणार आहेत. टायटल स्पॉन्सर मोबाईल कंपनी विवो (VIVO) लीगच्या प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीतून मिळालेल्या माहितीनुसार, टाटा ग्रुपने टायटल स्पॉन्सर म्हणून विवोची जागा घेतली आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी म्हंटले आहे.
लीगसोबतच्या प्रायोजकत्व करारासाठी विवोकडे काही वर्षे शिल्लक आहेत, परंतु या काळात टाटा मुख्य प्रायोजक राहील. या लीगचे नाव आता टाटा आयपीएल असेल. विवोने २०१८ मध्ये वार्षिक ४४० कोटी रुपये खर्चून टायटल हक्क विकत घेतले होते. चिनी स्मार्टफोन निर्मात्यांनी २०२० मध्ये भारत-चीन राजनैतिक वादामुळे हा करार एका वर्षासाठी थांबवला. तेव्हा हे अधिकार Dream11 ला हस्तांतरित केले गेले.
Correction | TATA to replace VIVO as IPL title sponsor *for the upcoming edition of the league: IPL Chairman Brijesh Patel to ANI pic.twitter.com/YJDiYe1bap
— ANI (@ANI) January 11, 2022
विवोने आता आयपीएलचे अधिकार टाटाकडे हस्तांतरित केले आहेत. २०२२च्या हंगामासाठी Dream11 ही कंपनी आयपीएलची टायटल स्पॉन्सर होती. त्याला २२२ कोटी रुपयांचे प्रायोजकत्व अधिकार मिळाले. आयपीएल २०२० करोनामुळे यूएईमध्ये खेळवण्यात आले.