कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

नवी दिल्लीः देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी अॅक्शन मोडमध्ये आले आहे. नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वासंवाद साधणार आहेत.

कोरोनाचे रूग्ण संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोना आणि ओमायक्रॉनच्या परिस्थिती आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ जानेवारीला ३० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात वाढत्या ओमाक्रॉनसंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत ओमायक्रॉनचा प्रसार थांबवण्यावर उपाययोजना, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनासाठी पर्याय, औषधांच्या उपलब्धतेसह आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण यांचा आढावा घेण्यात आला होता. याबरोबरच ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर, पीएसए प्लांट, आयसीयू, ऑक्सिजन बेड आणि लसीकरणाच्या स्थितीचा आढावा घेण्यात होता.

Share