महाराष्ट्रातले औरंगाबाद हे शहर ‘मका हब’ म्हणून ओळखले जाते कारण औरंगाबाद मधील सिल्लोड,कन्नड,सोयगाव या तालुक्यात मोठ्याप्रमाणावर मक्याच पीक घेतले जाते. आता पंतप्रधाना सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत औरंगाबाद मध्ये १०७ लघु उद्योगाचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत या योजनेतून सूक्ष्म अन्न प्रकिया उद्योग, इन्क्युबेशन सेंटर,पायाभूत सुविधा,ब्रँडीग,विपणन, क्षमता बांधणी,संशोधनासाठी प्रशिक्षण इत्यादी प्रस्ताव मागवले होते. त्यात औरंगाबादचे सर्वाधिक प्रस्ताव मंजूर झाले. राज्यात १०७ प्रस्ताव असलेले औरंगाबाद हे पाहिले शहर आहे. त्या खालोखाल सांगली द्वितीय व पुणे तृतीय क्रमांकावर आहे. तेव्हा आता मका लघु उद्योगासाठी १० लाख पर्यन्त अनुदान मिळू शकते. या योजनेत ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अशी अट आहे. शेतकऱ्यांच्या मका पिकाला चांगला भावही मिळू शकतो त्याचबरोबर, प्रति प्रकल्प किमान चार लोकांना रोजगार मिळू शकतो असा अंदाज ही वर्तवला जात आहे. मका प्रक्रियेतून पशुखाद्य, कोंबडी खाद्य, पोहे, पीठ, फेक्सवेल इत्यादी उत्पादन घेता येऊ शकते.
आता जाणून घेऊया या योजनेचा फायदा काय ?
- सध्या कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, शेतकरी उत्पादक, स्वयंसाहाय्यता गट, सहकारी उत्पादक यांची पतमर्यादा वाढेल.
- उत्पादनांचे ब्रँडिंग व विपणन अधिक बळकट करून संघटित अशा पुरवठा साखळीशी जोडता येईल.
- देशात कार्यरत २ लाख उद्योगांना पाठबळ मिळेल.
- सामाईक प्रक्रिया जसे की साठवणूक, प्रयोगशाळा, पॅकेजिंग, विपणन, उद्योग वाढीसाठी सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळणार.
या क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण, विस्तारीकरण, आधुनिकीकरण, तांत्रिक साहाय्याचा अधिकाधिक लाभ मिळणार.
या योजनेचा लाभ कोणाकोणाला घेता येईल ?
- अन्नधान्य,फळे,भाज्या,तेलबिया,मासे,दूध,मसाला पिके,कडधान्य आणि किरकोळ वन उत्पादनावर प्रक्रिया करणारे सूक्ष्म अन्न प्रकिया उद्योग.
- वैयक्तिक लाभार्थी,तरुण,शेतकरी,महिला,कारागीर,मर्यादित दायित्व असलेले भागीदार.
- गट लाभार्थी, स्वयं सहाय्यता गट,शेतकरी उत्पादक गट,संस्था,उत्पादक सहकारी संस्था.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषि विभागातील जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आणि तालुकस्तरावर कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात.