खाद्य तोलाच्या किंमतीत घसरण, सर्वसामान्यांना दिलासा

दिल्ली : सततच्या महागाईने त्रस्त झालेल्या जनतेसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.  पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये झालेली वाढ सध्या सर्वसामान्यांना घाम फोडत आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळं भाजीपाला ते अगदी तेलाच्या किंमतींवरही याचे परिणाम दिसून आले. मालवाहतुकीवर इंधन दरवाढीचे थेट परिणाम सध्या स्पष्टपणे दिसून येत आहेत.

खाद्यतेलांच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बातमी पाहून आता अनेकजण घरात माहागाईच्या भीतीनं तेलाची साठवण करतील असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीतील तेल तिलहन बाजारात सोयाबीन, पाम तेल आणि बिनोला तेलाच्या दरांमध्ये घसरण दिसून आली. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शिकागो एक्सचेंजमध्ये 1.5 टक्क्यांची तेजी दिसून आली, याचे परिणाम पुरवठ्यावरही झाले आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना खाद्य तेलाच्या किंमती कमी झाल्याने नक्कीच सामान्यांना दिलासा  मिळाला असेल.

Share