वंचित-ठाकरे गट युतीची अधिकृत घोषणा; ठाकरेंकडून युतीची घोषणा

मुंबई :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा आज करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आज बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म दिवस आहे. प्रकाश आंबडेकर आणि आम्ही पुढची वाटचाल करण्यासाठी एकत्र आलो आहोत. माझे आजोबा आणि प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा हे स्नेही होते. दोन्ही पिढ्याचे वारसदार आणि जीवाला देणारे सहकारी एकत्र येऊन देश प्रथम याचा विचार करून पुढे जाणार आहोत. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र येत आहोत. पुढील राजकीय वाटचाल कशी असेल याच्याबद्दल आम्ही नंतर वेळेनुसार निर्णय घेऊच, अशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

शरद पवार आमच्यासोबत येतील – प्रकाश आंबेडकर

शरद पवार आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा बाळगतो. आता आम्ही दोघेच एकत्र आलो आहोत. काॅँग्रेस- राष्ट्रवादीने स्वीकारवं, असं आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी केलं. आज ईडीच्यामार्फत पाॅलिटिकल लीटर संपवण्याचा काम सुरु आहे. आपण कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. नरेंद्र मोदी यांचा देखील अंत होणार आहे, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Share