तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, चेक करा तुमच्या शहरातील दर

नवी दिल्ली : भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आज सकाळी ६ वाजता तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून दर स्थिर आहेत. आजही दिल्ली-मुंबईसह देशातील चारही महानगरे आणि प्रमुख शहरांमध्ये तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

आज इंडियन ऑईलनं जारी केलेल्या किंमतीनुंसार पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोलची किंमत ९१.४५ रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलची किंमत १२३.४७ रुपये प्रति लिटरनं विकल जात आहे. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत १०५.४१ रुपये आहे. तेल कंपन्यांनी २२ मार्च नंतर सलग १४ वेळा दरवाढ केली होती. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल १०.२० रुपयांनी महाग झालं होतं. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMS च्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे.

Share