तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, आज किती रुपयांना विकलं जातंय इंधन?

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. देशात सलग ५१ व्या दिवशी पेट्रोल- डिझेलचे दर स्थिर आहेत. दरम्यान, यापूर्वी २१ मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात घट केली होती. केंद्र सरकारनं उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल ९.५० रुपयांनी आणि डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झालं होतं.

राज्यातील प्रमुख शहरांतील दर

मुंबई – पेट्रोल १११.३५ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९७.२८ रुपये प्रति लीटर.

पुणे – पेट्रोल १११.१० रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९५ .५८ रुपये प्रति लीटर

ठाणे- पेट्रोल ११०.७८ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९५.२५ रुपये प्रति लीटर

नाशिक- पेट्रोल १११.२२ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९५.७० रुपये प्रति लीटर

नागपूर- पेट्रोल १११.६५ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९६ .१४ रुपये प्रति लीटर

औरंगाबाद- पेट्रोल १११ .७० रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९६.१६ रुपये प्रति लीटर

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून ९२२४९९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.

Share