पाडव्याच्याच दिवशी मुलाने केला वडिलांचा खून

औरंगाबाद : तालुक्यातील चिंचोली येथे मुलाने स्वत:च्याच वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी हत्येची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवार दि.२ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी, कडूबा भाऊराव घुगे (वय.६५) असे मयताचे नाव आहे. तर नानासाहेब कडूबा घुगे (वय.२५) असे आरोपीचे नाव आहे. सणाच्या दिवशी कडुबा घुगे हे घरात दारु पिऊन आल्यानं नानासाहेब यास संताप अनावर झाला. रागाच्या भरात नानासाहेब यानं लोखंडी घनानं आपल्या वडिलांच्या डोक्यात प्रहार केला. हा प्रहार इतका जोरदार होता, की यातच कडुबा घुगे यांचा जीव गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलगा नानासाहेब कडूबा घुगे याला चिकलठाणा पोलीसांनी लगेच ताब्यात घेतले आहे. पुढिल तपास चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे हे करतं आहे.

Share