एक सफरचंद आरोग्या साठी फायदेशी

सफरचंद सर्वांनाच आवडते असे नाही पण तरीही एक सफरचंद १०० फळांची उर्जा देणारे फळ आहे. म्हणूनच रुग्णालयात असणा-या सर्व रुग्णांना डॉक्टर रोज सफरचंद खाण्याचा सल्ला देतात शिवाय भेटायला येणारी प्रत्येक व्यक्ती सफरचंदच घेऊन येताना दिसते. सफरचंद आरोग्यास लाभदायकच नाही तर भूकेवर विजय मिळवण्यासाठी देखील उपयुक्त ठरते. दिवसातून ३ ते ४ सफरचंद खाल्ल्यास आपली डायटींग यशस्वी होऊ शकते आणि पोटंही भरलेले राहते. लठ्ठपणासंबधीत आजार दूर करण्यासाठी सफरचंदातील तत्व फायदेशीर ठरतात. आरोग्य आणि सौंदर्य यांचे वर्धनसाठी सफरचंदात महत्त्वपुर्ण क्षार असतात. नियमित रोज एक तरी सफरचंद खावे.

  • सफरचंदामधील क्वरसिटीन पेशींना नुकसानापासून वाचवतो आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
  •  सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात ‘फायबर’ असल्यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते.
  • सफरचंदाच्या सालीमुळे कफची समस्या दूर होते.
  • सफरचंदाच्या रसात गुलाब जलाचे काही थेंब टाकून चेहर्‍यावर चोळल्यावर सावळा रंग उजळविण्यास मदत होते.
  •  केसातील कोंडा कमी करण्यासाठी रोज नियमितपणे सफरचंदाचा रस केसांच्या मुळांना चोळावा, थोड्या वेळाने केस स्वच्छ पाण्याने धुवावेत.
  • सफरचंद आयुर्वेदिक गुणकारी फळ आहे, कॅमिकल टाकून तयार केलेले सफरचंद बाजारात असल्यामुळे सफरचंद नीट बघून घ्यावेत आणि स्वच्छ धुवून खावेत.
Share