एक हजार कोटींचे आरोप बालीशपणाचे – राजेंद्र पातोडे

अकोला :  वंचित वर बालिश आरोप करणार शिवसेनेचा पाचवी शिकलेल्या अडाणी अल्पशिक्षित आमदार संतोष बांगर ह्याला प्रौढा शिक्षण वर्गात दाखल करुन त्याला अंकगाणित आणि बाराखडीची पुस्तके उपलब्ध करुन देऊन त्याला साक्षर करण्याचा निर्धार युवा आघाडीने केला आहे. बौद्ध समाजाची ताकद दाखवून देण्यासाठी कार्यकर्त्यांना आदेश दिला असून लवकरच ‘बांगरला घोडा लावू’ असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे.
 शिवसेनेचा जुगार चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या संतोष बांगर या आमदाराने अकलेचे तारे तोडले. १ हजार कोटी रुपयांचा हास्यास्पद व बालीश आरोप केला आहे. वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अडाणी बांगरला आधी प्रौढ शिक्षण शाळेत घालावे, असे निर्देश दिले आहेत. जेणेकरून त्याला एक हजारावरील शून्य वाचण्याची अक्कल आली पाहिजे. आणि आमदार बांगर ह्याने दुसरा आरोप बौद्ध समाजावर केला आहे. याचे परिणाम देखील त्याला भोगावे लागतील.

राज्यात जिथे बांगर दिसेल तिथे त्याला घोडे लावण्याचे आदेश युवा कार्यकर्त्यांना दिले आहेत. बांगरने केलेले आरोप त्याने सिद्ध करावे. किंवा बिनशर्त माफी मागावी. अन्यथा बांगरला नांगर लावूच असा इशारा देखील राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे. तर एकीकडे मविआमधील मंत्र्यांची जेलमध्ये जाण्याची स्पर्धा लागली आहे. त्याची धग आता मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचली आहे. यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी बांगर सारखे जुगारी आमदार बाश्फळ बडबड सुरू केल्याची टीका युवा आघाडीने केली आहे.

काय केले होते संतोष बांगर यांनी आरोप

Share