मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून टोलेबाजी सुरु आहे. नास्तिक असणारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढलेत. शरद पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात असं भाजपनं म्हटलं आहे. मात्र या व्हिडीओवरून भाजप गोत्यात येण्याची शक्यता आहे. कारण अर्धवट व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी कारवाई करण्याच्या हालचाली गृहविभागानं सुरू केल्या आहेत.
शरद पवारांच्या भाषणाचा अर्धवट व्हिडीओ शेअर करून जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी काय कारवाई करता येईल, याची चाचपणी गृह विभागान सुरू केली आहे. त्यासाठी गृहखात्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे अर्धवट व्हिडीओ शेअर करण भाजपला महागात पडण्याची शक्यता आहे.
झूठ की उम्र तब तक होती है जब तक सच का सामना नहीं होता..
भाजप हा अर्धवटरावांचा पक्ष आहे हे आता सर्वज्ञात आहे, पण अर्धे मुर्धे व्हिडीओ दाखवून, अर्धी कच्ची लोणकढी थाप मारून, पूर्ण सत्य लपवता येत नाही..
निदान पूर्ण व्हिडीओ दाखवण्याची अर्धांश हिम्मत तरी ठेवायची होती. pic.twitter.com/MYSjSKj9Gq
— NCP (@NCPspeaks) May 12, 2022
भाजपने काय टीका केली होती?
शरद पवार नेहमीच हिंदू धर्माची बदनामी करतात. जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते, असा निशाणा साधत भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शरद पवार यांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्वीट करण्यात आला होता.
नास्तिक @PawarSpeaks यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढालेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात.
पवारांनी हिंदूं धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते.
पवार साहेब ह्या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा! pic.twitter.com/KnTtjUuTHo
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 11, 2022
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल सातारा मध्ये भाषणात एका कवितेचा संदर्भ देत तिचा अर्थ सांगितला होता. मात्र भाजपने एडिटेड व्हिडिओ व्हायरल केला, असं राष्ट्रादी काँग्रेसचं म्हणणं आहे. ‘झूठ की उम्र तब तक होती है जब तक सच का सामना नहीं होता. भाजप हा अर्धवटरावांचा पक्ष आहे हे आता सर्वज्ञात आहे, पण अर्धे मुर्धे व्हिडिओ दाखवून, अर्धी कच्ची लोणकढी थाप मारून, पूर्ण सत्य लपवता येत नाही. निदान पूर्ण व्हिडिओ दाखवण्याची अर्धांश हिम्मत तरी ठेवायची होती अशी टिका राष्ट्रवादी काॅग्रेस कडून करण्यात आली आहे.