मुंबई : देशात सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कायम आहे. आज इंधन कंपन्यानी पेट्रोल- डिझेलमध्ये प्रति लिटर ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीसह मुंबईत पेट्रोलचा आजचा दर मुंबईमध्ये पेट्रोलचे दर तब्बल १११.६७ रुपये प्रति लिटर झाले असून, डिझेल ९५.८५ रुपये प्रति लिटर या दराने मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर असेच वाढत असल्यानं सर्वसामान्यांचा जीव अक्षरश मेटाकुटील आले आहेत.
जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने त्यांच्यावर मोठा बोजा पडला आहे. त्याची भरपाई करण्यासाठी किरकोळ दरात वाढ करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर १११.०३ रुपये लिटर तर डिझेल ९३.८३ रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोल ११०.६७ रुपये तर डिझेल ९३.४५ रुपये लिटर मोजावे लागत आहेत.
जागतिक बाजारात कच्चा तेलाचे दर प्रति १०० डॉलरच्या वर गेल्याने कंपन्यांना तोटा सहन करावा लागत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याची भरपाई करण्यासाठी या आठवड्यात दरात सातत्याने वाढ करण्यात येणार आहे. तेल कंपन्यांचे म्हणणे आहे की, १२रुपये प्रति लिटरने वाढ केल्यानंतरच त्यांचे नुकसान भरून काढता येईल.
Price of petrol & diesel in Delhi at Rs 97.01 per litre & Rs 88.27 per litre respectively today (increased by 80 paise)
Petrol & diesel prices per litre- Rs 111.67 & Rs 95.85 in Mumbai (increased by 85 paise)
(File pic) pic.twitter.com/MBmUU7KN6c
— ANI (@ANI) March 23, 2022
पेट्रोल-डिझेल दर अशा प्रकारे तपासा
आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMS च्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP ९२२३११२२२२ आणि एचपीसीएल ग्राहक यांना ९२२२२०११२२ संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. सकाळी ६ वाजल्यापासून नवी दर लागू केले जातात.