UK मधून पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याचा कॉल

सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास यासंदर्भात कॉल आल्याप्रकरणी अमरावतीत भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी तक्रार दाखल केली आहे.

. पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज उडवून टाकण्याची धमकी दिली गेलीय. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास यासंदर्भात कॉल आल्याप्रकरणी अमरावतीत भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी तक्रार दाखल केली आहे.

पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्या कॉल संदर्भात पोलीस आयुक्तांकडे तक्रार देण्यात आली आहे. कॉल करणाऱ्याने आपण खलिस्तान समर्थक असल्याचं सांगत धमकी दिली असल्याचा आरोप शिवराय कुळकर्णी यांनी पत्रात केला आहे. कुळकर्णी यांनी पत्रात म्हटलं की,
आज 11 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजून 18 मिनिटांनी +447537168320 या क्रमांकावरून मला फोन आला. कॉल वर युनायटेड किंगडम असे दिसत असल्याचं शिवराय कुळकर्णी यांनी म्हटलंय.

Share