पंतप्रधान मोदींच्या पूर्वेकडील दौऱ्याला आमचा विरोध आहे; परराष्ट्र मंत्रालय

सोमवारी पंतप्रधान मोदींच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर चीनने निषेध व्यक्त केला आहे. शेजारी देशाने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेश हा आपला प्रदेश असल्याचा दावा केला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले की, भारताच्या पावलांमुळे LAC वर तणाव वाढणार आहे. भारत जे काही करत आहे त्यामुळे सीमेबाबत दोन्ही देशांमधील वाद आणखी वाढू शकतो. पंतप्रधान मोदींच्या पूर्वेकडील दौऱ्याला आमचा विरोध आहे. आम्ही भारताकडे आमचा निषेधही व्यक्त केला आहे. चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेट म्हणतो, त्यांनी त्याचे नाव जंगनान ठेवले आहे-असे परराष्ट्र मंत्रालय  म्हणाले आहे.

अरुणाचल प्रदेशचे नाव जंगनान असे सांगताना वांग म्हणाले – भारताच्या बाजूला बेकायदेशीरपणे स्थापन झालेल्या अरुणाचल प्रदेशला आमच्या सरकारने कधीही मान्यता दिली नाही. आजही आमचा विरोध आहे. हा चीनचा भाग आहे आणि भारत आपल्या इच्छेनुसार येथे काहीही करू शकत नाही.

वांग वेनबिन पुढे म्हणाले की, “भारताच्या अशा हालचालींमुळे सीमा विवाद आणखी गुंतागुंतीचा होईल. भारत-चीन सीमेच्या पूर्वेकडील भागात भारतीय नेत्याच्या भेटीमुळे चीन असमाधानी आहे आणि त्याला विरोध करत असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी गेल्या शनिवारी अरुणाचल प्रदेशला भेट देत हजारो कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

Share