RCB ची किंग साठी स्पेशल पोस्ट; विराट कोहली

इंडियन प्रीमयर लीग 2024 स्पर्धा दहा दिवसातच म्हणजेच 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना दिसणार आहे. 16 वर्षांच्या प्रवासाचे सेलिब्रेशन म्हणून बेंगलोरने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे-

विराट गेली 16 वर्षे बेंगलोरकडूनच आयपीएल खेळत आहे. त्याला आयपीएलच्या पहिल्या हंगामाच्या लिलावात बेंगलोरने संघात घेतले होते, विराटला अवघ्या 12 लाखात बेंगलोरने संघात घेतले होते. पण त्यानंतर त्याने नेहमीच बेंगलोरसाठी चांगली कामगिरी केली. तो असा एकमेव खेळाडू आहे, जो आयपीएलच्या आत्तापर्यंतच्या सर्व हंगामात एकाच संघात खेळत आहे. . या पोस्टवर लिहिले आहे की ’16 वर्षे, 1 राजा’ (16 Years 1 King).

विराटने 2011 ते 2021 दरम्यान बेंगलोरचे नेतृत्वही केले असून त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 2016 मध्ये बेंगलोरने अंतिम सामन्यातही प्रवेश केला होता. परंतु, त्यांना अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता.

त्याच्यानंतर संघाचे नेतृत्व फाफ डू प्लेसिसकडे देण्यात आले. विराटने 140 सामन्यात बेंगलोरचे नेतृत्व करताना 64 विजय आणि 69 पराभव स्विकारले, तो आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणाराही खेळाडू आहे.

 

Share